उत्तर पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मासवडी रेसिपी |  Masvadi Recipe

masvadi thali

    
पुणे जिल्ह्याचा उत्तर भाग म्हटलं कि नजरेसमोर येतो तो शिवजन्मभूमी असलेला शिवनेरी किल्ला, भीमाशंकर ज्योतिर्लिंग, ओझर, लेण्याद्रीचा अष्टविनायकातील एक असे गणपती, माळशेज घाट, नाणे घाट, GMRT प्रोजेक्ट आणि बरंच काही. म्हणजे खेड, आंबेगाव आणि जुन्नर हा पट्टा फेमस आहे तो येथील पर्यटन स्थळांसाठी. या पर्यटन स्थळांबरोबरच येथील खाद्य संस्कृती हि फेमस आहे. मग उन्हाळ्यात विविध गावांची जत्रा असो किंवा कोण्या बाळाची पाची, अपेक्षित असा पदार्थ नजरेसमोर येतो तो म्हणजे "Masvadi". 
    जुन्नरकर असो किंवा आंबेगावकर, ज्याच्या तोंडी masvadi चे नाव नाही अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही. Masvadi Rassa आणि bhakar चुरून खाण्यात जी मजा आहे ती pizza, burger मध्ये नाही असे म्हणू शकतो. त्यामुळेच जे नोकरीनिमित्त गाव सोडून शहरात स्थायिक झालेत असे लोक जेव्हा जत्रेच्या निमित्ताने गावी येतात तेव्हा त्यांचा असतो मासवडी चा बेत. चला तर मग अश्या Masvadi Thali ची रेसिपी पाहुयात.


maswadi recipe ingredients


सामग्री:

Masvadi Recipe सारणासाठी:

  • १ वाटी हौरी,
  • २ वाटी बारीक चिरलेला कांदा, 
  • २ किसलेल्या खोबऱ्याच्या वाट्या, 
  • अर्धी वाटी शेंगदाणे,
  • १ वाटी लसूण,
  • १ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर,
  • ४ चमचे तेल


Masvadi आवरणासाठी:

  • २ वाट्या बेसन पीठ,
  • चिमूटभर हिंग,
  • चवीनुसार मीठ,
  • १ चमचा हळद,
  • १ चमचा लाल तिखट,
  • १ चमचा जिरे,
  • १० ते १२ लसूण पाकळ्या,
  • अर्धी वाटी किसलेले खोबरे,
  • बारीक चिरलेली कोथिंबीर,
  • २ चमचे तेल,
  • दिड ग्लास पाणी,


Masvadi रस्स्यासाठी:

  • १ चमचा हिंग,
  • १ चमचा हळद,
  • १ चमचा गरम मसाला,
  • १ चमचा मीठ,
  • १ चमचा लाल तिखट,
  • १ चमचा मोहरी,
  • ५ ते ६ पाने कढीपत्ता,
  • पाणी रस्स्यापुरते,
  • ३ चमचे तेल,


maswadi recipe marathi

कृती:

Masvadi सारणासाठी कृती :

masvadi saran ingredients

१) सर्वप्रथम एका कढईत हौरी व्यवस्थित भाजून घ्या .

२) आता २ वाट्या किसलेले खोबरे भाजून घ्या.

३) आता कढईत २ चमचे तेल घेऊन त्यात शेंगदाणे भाजून घ्या.

४) आता एक वाटी लसूण भाजून घ्या.

५) आता कढईत २ चमचे तेल घेऊन त्यात कांदा परतून घ्या.

६) आता भाजलेली हौरी, खोबरे, शेंगदाणे, लसूण मिक्सर मधून बारीक वाटून घ्या व परतलेल्या कांद्यावर टाका.

७) आता यात चिमूटभर हिंग, चवीनुसार मीठ, १ चमचा हळद, १ चमचा लाल तिखट, १ चमचा गरम मसाला व १ चमचा धना पावडर टाकावे.

८) आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यावे व शेवटी त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी.

masvadi che saran


Masvadi आवरणासाठी कृती:

masvadi avaran

१) २ वाट्या बेसन पीठ, चिमूटभर हिंग, चवीनुसार मीठ, १ चमचा हळद, १ चमचा लाल तिखट, १ चमचा जिरे, १० ते १२ लसूण पाकळ्या, अर्धी वाटी किसलेले खोबरे, बारीक चिरलेली कोथिंबीर.

२) आता बेसन पीठ सोडून सर्व सामग्री मिक्सर मधून बारीक करून घ्यावी.

masvadi recipe in marathi

३) आता कढईत २ चमचे तेल घ्या.

४) तेल गरम झाल्यावर त्यात मिक्सर मध्ये वाटलेला मसाला टाकावा व व्यवस्थित हलवून घ्यावे.

५) मिश्रण तेलात व्यवस्थित मिक्स झाल्यावर त्यात दीड ग्लास पाणी टाकावे व उकळून घ्यावे. 

६) आता पाण्याला उकळी आल्यावर त्यात बेसन पीठ हळू हळू सोडावे व हाटून घ्यावे जेणेकरून त्यात गोळ्या राहणार नाहीत.

७) बेसन पीठ व्यवस्थित हाटून झाल्यावर झाकण ठेऊन ५ मिनिटे वाफ काढून घावी व पाण्याचा हात लावून बेसन पीठ व्यवस्थित शिजले आहे का पाहावे.

masvadi preparation

८) आता एक पोळपाट घेऊन त्यावर एक ओला रुमाल अंथरावा व त्यावर थोडी कोथिंबीर व किसलेले खोबरे टाकावे.

९) आता शिजवलेल्या बेसन पिठाचा गोळा घेऊन हाताला थोडे पाणी लावून थापून घ्यावा.

१०) आता त्यावर बनवलेले सारण व्यवस्थित पसरवून घ्यावे.

masvadi recipe

११) आता मासवडी व्यवस्थित त्रिकोणी थापून घ्यावी.

१२) आता तयार झालेली masvadi अलगद हातांनी बाजूला काढून घेऊन सुरीच्या साहाय्याने कापून घावी. 

masvadi

masvadi recipe


Masvadi रस्स्यासाठी कृती:

१) आता कढईत २ चमचे तेल टाकून कांदा परतून घ्या. 

२) आता थोडे खोबरे परतून घ्या.

३) आता लसूण व आले व्यवस्थित परतून घ्या.

४) आता परतलेला कांदा, खोबरे, लसूण व आले मिक्सर मधून काढून बारीक करून घ्या.

masvadi rassa ingredients

५) आता एका कढईत ३ चमचे तेल घेऊन गरम करून घ्या. 

६) त्यात कढीपत्ता टाका.

७) आता त्यात मोहरी व हिंग टाकून फोडणी देऊन घ्या.

८) आता मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्या.

९) मसाला परतून घेतल्यावर त्यात १ चमचा हळद, १ चमचा गरम मसाला, १ चमचा मीठ व १ चमचा लाल तिखट टाका.

१०) आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या.

११) मासवडी आवरणाच्या पिठाची खरड जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढ्या पाण्यात मिक्स करून मसाल्यात टाका.

१२) आता रस्याला चांगली उकळी आणली कि आपला रस्सा तयार आहे.


अशी हि आपली झणझणीत masvadi भाकरी व कांद्याबरोबर खाण्यासाठी तयार आहे.


maswadi recipe video


FAQ:

1) What is hauri (हौरी)?
ans: हौरी म्हणजेच पांढरे तीळ, जुन्नर भागात पांढऱ्या तिळांना हौरी असे म्हणतात.

2) मासवडी कशाबरोबर खावी?
ans: मासवडी ही बाजरीच्या भाकरी बरोबरच छान लागते. त्यामुळे तुम्ही मासवडीच्या रस्स्यामध्ये भाकरी चुरून खाल्ल्यास त्याची टेस्ट अप्रतीम लागते. 

3) मासवडी कोणी खाऊ नये?
ans: मासवडी ही चवीने झणझणीत असल्यामुळे पित्त प्रवृत्त्तीच्या लोकांनी थोडे जपूनच खावी. 

4) How to make masvadi?
ans: वरील रेसिपी ही परिपूर्ण आहे. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी पाहून घरीही मासवडी करू शकता. 

विशेष टीप:
मासवडी बनविण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो. त्यामुळे वेळेचे नीट व्यवस्थापन करून सकाळी लवकरच स्वयंपाकाला लागावे. नाहीतर जेवणास उशीर होऊ शकतो. 

Also Read:

जुन्नरची शेंगोळे बनवण्याची पद्धत | shengole recipe in marathi -Link

उत्तर पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मासवडी रेसिपी |  Masvadi Recipe -Link

लोह, प्रथिने व फायबर युक्त पौष्टिक पालकचे पराठे | Palak Paratha Recipe in Marathi -Link

चमचमीत, चटकदार असा बनवा वडापाव | vada pav recipe in marathi | मुंबईचा प्रसिध्द बटाटा वडा -Link

गूळ चिंच घालून अशी करा अळूवडी | अळूवडी | aluvadi recipe in marathi -Link

सर्वांचा लाडका नाश्ता | शिळ्या चपातीचा चटकदार काला | leftover chapati recipe -Link

खरवस | kharvas recipe in marathi | Gaicha Chik -Link

एकादशी स्पेशल साबुदाणा खिचडी | sabudana khichdi recipe in marathi -Link