सर्वांचा लाडका नाश्ता | शिळ्या चपातीचा चटकदार काला | leftover chapati recipe

रात्रीच्या चपात्या उरल्यात का ? आता या चपात्यांचे (leftover chapati) काय करायचे याचा विचार करताय का ? तर मग आता  त्याचा विचार सोडून द्या ,कारण आम्ही घेऊन आलो आहोत आपणासाठी अशी एक delicious recipe in marathi ज्याने रात्री   उरलेल्या चपात्यांचे नियोजन होईल ,व संपूर्ण कुटुंबाचा breakfast हि होईल.  नमस्कार मंडळी, या blog वर आपले सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत चपातीचा किंवा भाकरीचा काला (leftover chapati recipes). काही भागात याला चुरमा तसेच फोडणीची पोळी असेहि म्हणतात.


leftover chapati


चला तर मग रेसिपी चालू करू.


कृती:

१) सर्वप्रथम आपण एका डिश मध्ये चपातीचे छोटे तुकडे करून घेऊ. जास्त बारीक तुकडे करू नका कारण आपण यांना मिक्सरमध्ये बारीक करणारच आहोत. त्यामुळे मिक्सर भांड्यात बसतील असेच तुकडे करून घ्या.

२) आता या चपातीच्या तुकड्यांना मिक्सर भांड्यात काढून घ्या व यात ७ ते ८ लसणाच्या पाकळ्या टाकून मिक्सरवरून फिरवून बारीक करून. फारच बारीक करायची गरज नाही.

३) आता एका कढईत २ ते ३ चमचे तेल घ्या. 

४) आता यात १ चमचा ओवा टाका. ओवा टाकताना तो व्यवस्थित चोळून टाकावा जेणेकरून त्याचा छान वास येईल. 

५) आता यात चिमूटभर हिंग टाका. 

६) १ वाटी चिरून घेतलेला कांदा आता यात आपण टाकू व व्यवस्थित परतून घेऊ. 

७) कांदा व्यवस्थित परतल्यावर यात आपण टाकणार आहोत १ चमचा हळद, १ चमचा लाल तिखट, चवीपुरते मीठ. आता हे आपण व्यवस्थित हलवून घेऊ. 

८) आता यात चपात्यांचा केलेला चुरा टाकुयात व व्यवस्थित हलवून घेऊयात. 

९) आता शेवटी यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू व मिक्स करून घेऊ. आता कढईवर झाकण ठेऊन आपण १ वाफ काढून घेऊ.

अशाप्रकारे तयार आहे आपला चपात्यांचा काला. आता चपात्या उरल्यावर आपणही हि रेसिपी तरी करून पहा. आपल्याला हि रेसिपी कशी वाटली कंमेंट मध्ये नक्की सांगा. 



Also Read:

जुन्नरची शेंगोळे बनवण्याची पद्धत | shengole recipe in marathi -Link

उत्तर पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मासवडी रेसिपी |  Masvadi Recipe -Link

लोह, प्रथिने व फायबर युक्त पौष्टिक पालकचे पराठे | Palak Paratha Recipe in Marathi -Link

चमचमीत, चटकदार असा बनवा वडापाव | vada pav recipe in marathi | मुंबईचा प्रसिध्द बटाटा वडा -Link

गूळ चिंच घालून अशी करा अळूवडी | अळूवडी | aluvadi recipe in marathi -Link

खरवस | kharvas recipe in marathi | Gaicha Chik -Link