गूळ चिंच घालून अशी करा अळूवडी | अळूवडी | alu vadi recipe in marathi

alu vadi


अळूवडी (Aluvadi) हि महाराष्ट्रातील सर्वात आवडती dish. म्हणजे कोणी aluvadi नाव घेतले न तोंडाला पाणी नाही सुटले असे होऊच शकत नाही. अगदी लहानपणी जर कोणी डब्याला aluvadi आणली तर डब्बा उघडताच पुढच्या काही सेकंदात ती गायब व्हायची. आता ऑफिस मध्येही तीच अवस्था. म्हणजे शाळा असो को ऑफिस, aluvadi snacks हि सर्वांची लाडकी डिश असते. 

चला तर मग अश्या special डिश ची रेसिपी (aluvadi recipe in marathi)आपण पाहुयात.

alu vadi ingredients 

सामग्री:

  • अळूची पाने, 
  • २ वाट्या बेसन पीठ, 
  • १/२ वाटी चिंच गुळाचे पाणी, 
  • १ ग्लास पाणी,
  • १ & १/२ चमचा लाल तिखट, 
  • १ चमचा हळद, 
  • चिमूटभर हिंग,
  • १ चमचा ओवा, 
  • चवीप्रमाणे मीठ, 
  • ३ चमचे हौरी सफेद तीळ, 
  • २ वाट्या तेल,

alu vadi recipe

कृती: 

१) सर्वप्रथम अळूची पाने व्यवस्थित धुवून घ्यावीत व पानांचा देठ सुरीच्या साहाय्याने कापून टाका.

२) आता बेसन पिठामध्ये १ ते १ १/२ चमचा लाल तिखट, १ चमचा हळद, चिमूटभर हिंग, १ चमचा ओवा, चवीपुरते मीठ, ३ चमचे हौरी (सफेद तीळ), २ चमचे चिंच गुळाचे पाणी टाकावे.

३) आता या मिश्रणात पाणी टाकून पीठ व्यवस्थित भिजवून घ्यावे.

alu vadi ingredients


४) आता ५ ते ६ पाने घेऊन बेसन पीठ लावून व्यवस्थित चिटकून घ्यावीत.


alu vadi leaf


५) पाने व्यवस्थित चिटकून झाल्यावर दोन्ही कडा दुमडून घ्याव्यात आणि गोल वळकुटी करावी.


alu vadi leaf benefits


६) आता कुकरमध्ये पाणी घेऊन त्यात एक डबा ठेऊन त्या डब्यात तयार केलेल्या वळकुट्या ठेवाव्यात.


alu vadi recipe in marathi


७) आता कुकरच्या ४ ते ५ शिट्ट्या घेऊन कुकर थंड झाल्यावर वळकुट्या बाहेर काढून घ्या.

८) आता आपल्या वळकुट्या पातळ कापून घ्या.


alu vadi cutting


९) एका कढईत २ वाट्या तेल घेऊन तेल गरम झाल्यावर त्यात वड्या तळून घ्या. 

१०) आता वड्या कडक तळल्यावर तेलातून काढून घ्या.


alu vadi deep fry

 

११) आता आपल्या खरपूस अळूवड्या खाण्यासाठी तयार आहेत.   

alu vadi recipe in marathi video



Also Read:

जुन्नरची शेंगोळे बनवण्याची पद्धत | shengole recipe in marathi -Link

उत्तर पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मासवडी रेसिपी |  Masvadi Recipe -Link

लोह, प्रथिने व फायबर युक्त पौष्टिक पालकचे पराठे | Palak Paratha Recipe in Marathi -Link

चमचमीत, चटकदार असा बनवा वडापाव | vada pav recipe in marathi | मुंबईचा प्रसिध्द बटाटा वडा -Link

सर्वांचा लाडका नाश्ता | शिळ्या चपातीचा चटकदार काला | leftover chapati recipe -Link

खरवस | kharvas recipe in marathi | Gaicha Chik -Link

एकादशी स्पेशल साबुदाणा खिचडी | sabudana khichdi recipe in marathi -Link