जुन्नरची शेंगोळे बनवण्याची पद्धत | shengole recipe in marathi



shengole


Shengole Recipe Ingredients

सामग्री: 

१) Shengole बनविण्यासाठी:

  • हुलग्याचे पीठ (२ वाट्या),
  • मिरची पावडर (१/२ चमचा),
  • हिंगपावडर (१/२ चमचा),
  • जिरे (१/२ चमचा),
  • लसूण (८ ते १० पाकळ्या),
  • पाणी (गरजेनुसार),
  • तेल (२ ते ३ चमचे),

२) Shengole Rassa बनविण्यासाठी:

  • भाजून सोललेले शेंगदाणे (मूठभर),
  • हिंगपावडर (१/२ चमचा),
  • जिरे (१/२ चमचा),
  • लसूण (५ ते ६ पाकळ्या),
  • पाणी (गरजेनुसार),
  • तेल (२ ते ३ चमचे),


shengole recipe in marathi

कृती: 

Shengole बनविण्यासाठी:

१) सर्वप्रथम लसूण, जिरे, हिंग पावडर, मिरची पावडर आणि मीठ एकत्र करून मिक्सर मधून बारीक करून घ्यावे.


shengole ingredients

२) तयार झालेले मिश्रण हुलग्याच्या पिठात मिक्स करावे.

३) पिठात गरजेप्रमाणे पाणी मिसळून व्यवस्थित घट्ट मळून घ्यावे.

४) पिठाचा व्यवस्थित गोळा करून घ्यावा व नंतर तेलाचा हात लावावा.

५) Shengole Rassa करण्यासाठी थोडा पिठाचा गोळा बाजूला काढून ठेवावा.

६) सर्वप्रथम हाताला तेल लावून पिठाचा छोटासा गोळा तोडून घ्यावा.

७) फोटोत दाखवल्याप्रमणे पोळपाटावर shengole बनवून घ्यावी.

Shengole

kulith shengole recipe

Shengole Rassa बनविण्यासाठी:

१) एका पातेल्यात २ ग्लास पाणी घेऊन त्यात १ ते २ चमचे तेल ओतावे व त्याला उकळी आणावी.

२) पाणी उकळल्यावर त्यावर थंड पाणी शिंपडावे व तयार केलेल्या shengole अलगद सोडाव्यात. 

३) पाण्याला पुन्हा उकळी आल्यावर पुन्हा पाणी शिंपडावे व तयार केलेल्या shengole चा दुसरा थर अलगद सोडावा. 

४) Shengole Rassa करण्यासाठी भाजलेले शेंगदाणे, लसूण, जिरे आणि हिंग एकत्र करून मिक्सर मधून बारीक करून घ्यावे.

५) रस्यासाठी बाजूला ठेवलेला गोळा घेऊन तो पाण्यात कालवून घ्यावा व शिजलेल्या shengole त टाकावा.

तसेच मिक्सवर मध्ये वाटलेला मसाला कालवून घ्यावा व शिजलेल्या shengole त टाकावा.

६) २ ते ३ चमचे तेल घालून १० ते १५ मिनिटे शिजवून घ्यावी. अशाप्रकारे आपली shengole खाण्यासाठी तयार आहे.  

shengole recipe video



Also Read:

जुन्नरची शेंगोळे बनवण्याची पद्धत | shengole recipe in marathi -Link

उत्तर पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मासवडी रेसिपी |  Masvadi Recipe -Link

लोह, प्रथिने व फायबर युक्त पौष्टिक पालकचे पराठे | Palak Paratha Recipe in Marathi -Link

चमचमीत, चटकदार असा बनवा वडापाव | vada pav recipe in marathi | मुंबईचा प्रसिध्द बटाटा वडा -Link

गूळ चिंच घालून अशी करा अळूवडी | अळूवडी | aluvadi recipe in marathi -Link

सर्वांचा लाडका नाश्ता | शिळ्या चपातीचा चटकदार काला | leftover chapati recipe -Link

खरवस | kharvas recipe in marathi | Gaicha Chik -Link

एकादशी स्पेशल साबुदाणा खिचडी | sabudana khichdi recipe in marathi -Link