नमस्कार. आज आपण पाहणार आहोत kharvas बनविण्याची recipe. त्याआधी आपण kharvas साठी लागणाऱ्या चिकाबद्दल थोडीशी माहिती घेऊ. जेव्हा गाई किंवा म्हशी व्यायल्यानंतर पहिले दूध निघते त्याला चिक म्हणतात. या दुधाला इंग्रजी मध्ये colostrum असे म्हणतात. हे दूध रोजच्या दुधापेक्षा थोडे घट्ट असते व पौष्टिकहि असते.
आपण साखरेचा वापर करत असल्यामुळे याची चव ही गोड असते. त्यामुळे ही डिश स्वीट डिश या श्रेणीत मोडते. खाण्यास गोड असलेल्या या स्वीट डिश चे चाहते अगदी लहानग्यांपासून वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत आहेत, खाण्यास मऊ असल्यामुळे ज्या वयोवृद्ध लोकांना दात नाहीत असे लोकही या डिश चा आस्वाद घेताना दिसतात. संपूर्ण भारत देशात महाराष्ट्रातच याचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे.
चला तर मग अश्या पौष्टिक पदार्थाची recipe सुरु करूयात.
kharvas recipe Ingredient
सामग्री:
चिक बनविण्यासाठी आपणास खालील सामग्री लागेल:
१ ग्लास कोवळे दूध (gaicha chik)
१ ग्लास साधे दूध
१ वाटी पिठी साखर
१ चमचा वेलची पूड
१ ग्लास पाणी
kharvas recipe in cooker
कृती:
आता पाहुयात स्टेप बाय स्टेप कृती.
१) सर्वप्रथम एका पातेल्यात १ ग्लास कोवळे दूध (gaicha chik) घ्या व त्यात तेवढ्याच मापाचे म्हणजेच १ ग्लास साधे दूध टाका व ते चांगले मिक्स करा. (कोवळे दूध व साधे दूध याचे माप एकास एक आहे १:१).
२) आता यामध्ये १ वाटी पिठी साखर टाका व ते चांगले मिक्स करा.
३) आता कुकर मध्ये बसेल असे भांडे घेऊन यात आपले मिश्रण टाका व भांडे कुकर मध्ये ठेऊन द्या.
४) आता आपल्या मिश्रणात १ चमचा वेलची पूड टाका जेणेकरून ती भांड्याच्या तळाला जमणार नाही.
५) आता आपला कुकर गॅस वर ठेऊन कूकरच्या ५ ते ६ शिट्ट्या घ्याव्यात व गॅस बंद करावा.
६) कुकर थंड झाल्यावर आतले भांडे बाहेर काढून घ्या .
७) आता आपणाला हव्या तश्या आकारात kharvas कापून खाऊ शकतो.
kharvas recipe with cheek
महत्वाची काळजी:
१) kharvas हा उष्ण असल्यामुळे उन्हाळ्यात याचे सेवन जपून करा.
२) kharvasache जास्त सेवन करू नये, लहान मुलांमध्ये पोटदुखी होऊ शकते.
५) वेलची बरोबर आपण kharvas मध्ये जायफळ पावडर टाकू शकता.
कोवळे दूध कुठे मिळू शकतो?
१) kharvas साठी लागणारे कोवळे दूध आपणास स्वीट च्या दुकानात मिळू शकतो. कोवळे दूध मिळण्याचा असा फिक्स टाईमिंग नसतो त्यामुळे जर दुकानदार आपल्या ओळखीचा असेल तर त्याला सांगून ठेवावे. कारण कोवळे दूध विक्रीस आले कि मागणी जास्त असल्यामुळे लगेच संपून जाते.
२) जर आपले रतिबाचे दूध असेल तर आपण गवळ्याला सांगून ठेऊ शकतो. गाई व्यायल्यानंतर तो आपणास हे दूध आणून देईल.
३) जर आसपास गाईंचा किंवा म्हशींचा गोठा असेल तर आपण गोठा मालकाला सांगून ठेऊन तेथून कोवळे दूध विकत घेऊ शकतो.
४) आपण शहरात राहत असाल व गावाकडून कोणी घरचे आपल्याकडे येत असेल तर त्यांनाही आपण आणायला लावू शकतो कारण गावाला हे कोवळे दूध मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते.
५) मेट्रो सिटीत राहत असाल तर मॉल मध्ये कोलोस्टरूम (कोलोस्टरूम) नावाने या कोवळ्या दुधाची विक्री होते. तेथून विकत घेऊन आपण वरील कृती प्रमाणे kharvas करू शकतो.
kharvas recipe youtube
Also Read:
जुन्नरची शेंगोळे बनवण्याची पद्धत | shengole recipe in marathi -Link
उत्तर पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मासवडी रेसिपी | Masvadi Recipe -Link
लोह, प्रथिने व फायबर युक्त पौष्टिक पालकचे पराठे | Palak Paratha Recipe in Marathi -Link
चमचमीत, चटकदार असा बनवा वडापाव | vada pav recipe in marathi | मुंबईचा प्रसिध्द बटाटा वडा -Link
गूळ चिंच घालून अशी करा अळूवडी | अळूवडी | aluvadi recipe in marathi -Link