चमचमीत, चटकदार असा बनवा वडापाव | vada pav recipe in marathi | मुंबईचा प्रसिध्द बटाटा वडा 

Vada Pav - एक उत्कृष्ट Indian street food ज्याचा उगम Mumbai, महाराष्ट्रातील गजबजलेल्या रस्त्यावर झाला आहे. "Indian Burger" म्हणून ओळखला जाणारा वडा पाव, ज्याने देश विदेशातील लाखो लोकांची मने जिंकली  आहेत. महाराष्ट्रातील अगदी गल्ली बोळात मिळणार पदार्थ म्हणजे वडापाव.

या डिशमध्ये दोन मुख्य घटक असतात. वडा आणि पाव. वडा एक मसालेदार तळलेले बटाट्याचे डंपलिंग आहे, त्यात मसाले मिसळले जातात, तर पाव हा मऊ bread आहे. एकत्र केल्यावर, ते फ्लेवर्स, टेक्सचर आणि मसाल्यांची एक कर्णमधुर सिम्फनी तयार करतात जे तुम्हाला अधिकची इच्छा निर्माण करतात.

Vada Pav चा इतिहास 1960 च्या दशकातील आहे, जिथे मुंबईतील कामगार वर्ग आणि विद्यार्थ्यांसाठी लवकर आणि खिशाला परवडणारा breakfast म्हणून त्याची संकल्पना होती. वर्षानुवर्षे, ते एक प्रिय street food icon म्हणून विकसित झाले आहे ज्याने प्रादेशिक सीमा ओलांडल्या आहेत.

त्याची लोकप्रियता दूरवर पसरत असताना, वडा पाव हा फक्त एक snacks नाही तर उत्साही आणि वैविध्यपूर्ण Indian street food सीनचे सांस्कृतिक प्रतीक आहे.

या recipe, आम्‍ही तुम्‍हाला हा iconic dish तयार करण्‍याच्‍या प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन करणार आहोत, ज्यामुळे तुम्‍हाला स्‍वत:च्‍या किचनमध्‍ये Mumbai steet food चे अस्सल flavours आणता येतील. चला तर मग या पाककलेच्या कृतीला सुरुवात करण्यासाठी सज्ज होऊ या आणि उत्कृष्ट वडा पाव बनवण्याची कला पारंगत करूया!

vada pav

vada pav ingredients 

सामग्री:

बटाटवड्याच्या भाजीसाठी : 

  • ५ ते ६ मध्यम आकाराचे बटाटे,
  • ७ ते ८ लसणाच्या पाकळ्या,
  • ३ कापलेल्या मिरच्या,
  • ५ ते ८ लिम्बड्याची पाने,
  • बारीक कापलेली कोथिंबीर,
  • २ ते ३ आल्याच्या फोडी,
  • चवीपुरते मीठ,
  • १ चमचा मोहरी,
  • १ चमचा जिरे,
  • १ चमचा ओवा,
  • चिमूटभर हिंग पावडर,
  • १/२ चमचा हळद,


बटाटवड्याच्या बाहेरील आवरणासाठी :

  • २ वाट्या बेसन पीठ,
  • ३ ते ४ चमचे तांदळाचे पीठ,
  • १ चमचा ओवा,
  • १ चमचा हळद,
  • १ चमचा हिंग,
  • चिमूटभर खाण्याचा सोडा,
  • चवीपुरते मीठ,

vada pav recipe

कृती:

१) सर्वप्रथम ५ ते ६ मध्यम आकाराचे बटाटे स्वच्छ धुवून कुकर मध्ये टाकून शिजवून घ्यावेत.

२) साधारण ५ शिट्यांमध्ये बटाटे व्यवस्थित शिजतात व नंतर गॅस बंद करावा.

बटाटवड्याच्या भाजीची पूर्वतयारी....

१) यासाठी एका मिक्सर भांड्यात ७ ते ८ लसणाच्या पाकळ्या, ३ कापलेल्या मिरच्या, ५ ते ८ लिम्बड्याची पाने, बारीक कापलेली कोथिंबीर, २ ते ३ आल्याच्या फोडी, चवीपुरते मीठ घेऊन मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे.


vada pav ingredients


२) यानंतर शिजवलेले बटाटे थंड झाल्यावर त्याची साल काढून घ्यावी.

३) आता साल काढलेले बटाटे हाताने बारीक करून घ्या किंवा आपल्या घरात मॅशर असेल तर ते हि आपण वापरू शकता.


बटाटवड्याच्या भाजीची मुख्यतयारी....

१) एका कढईत ४ चमचे तेल टाका व गरम करून घ्या.

२) गरम झालेल्या तेलात १ चमचा मोहरी, १ चमचा जिरे, १ चमचा ओवा, चिमूटभर हिंग पावडर, १/२ चमचा हळद व  मघाशी मिक्सर मधून काढलेले मिश्रण टाकावे.


ashok vada pav


३) आता यात बारीक केलेले बटाटे टाकावेत व व्यवस्थित मिक्स करून घ्यावेत.


vada pav near me


४) आता आपली भाजी तयार आहे.


बेसन पिठाची तयारी....

१) सर्वप्रथम एका बाउल मध्ये बेसन पीठ घेऊन त्यात ३ ते ४ चमचे तांदळाचे पीठ टाकावे, १ चमचा ओवा, १ चमचा हळद, १ चमचा हिंग, १ चमचा खाण्याचा सोडा व चवीपुरते मीठ टाकावे.

garden vada pav


२) आता हे मिश्रण एकत्र करून यात पाणी टाकून व्यवस्थित पेस्ट करून घ्यावी.

पीठ जास्त घट्ट किंवा जास्त पातळ हि ठेऊ नये.

३) आता एका कढईत वडे बुडतील एवढे तेल घेऊन गरम होण्यास ठेवा.

४) मघाशी तयार झालेल्या भाजीला वड्यांचा आकार देऊन घ्या.


mumbai vada pav

५) तेलाला ताव आल्यावर एक एक वडा तयार पिठात टाकून तळून घ्या.


calories in vada pav


६) बटाटवडे व्यवस्थित तळल्यानंतर हळूच एका डिश मध्ये काढून घ्या.


आता हा तळलेला बटाटावडा पावाबरोबर खायला तयार आहे. तोंडी लावायला आपण मिरच्या आणि लसणाची चटणीही करून खाऊ शकता.

how to make vada pav video



Also Read:

जुन्नरची शेंगोळे बनवण्याची पद्धत | shengole recipe in marathi -Link

उत्तर पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मासवडी रेसिपी |  Masvadi Recipe -Link

लोह, प्रथिने व फायबर युक्त पौष्टिक पालकचे पराठे | Palak Paratha Recipe in Marathi -Link

गूळ चिंच घालून अशी करा अळूवडी | अळूवडी | aluvadi recipe in marathi -Link

सर्वांचा लाडका नाश्ता | शिळ्या चपातीचा चटकदार काला | leftover chapati recipe -Link

खरवस | kharvas recipe in marathi | Gaicha Chik -Link

एकादशी स्पेशल साबुदाणा खिचडी | sabudana khichdi recipe in marathi -Link