देवाच्या स्मरणासाठी मंत्र जप हा सर्वश्रेष्ठ उपाय असून पुरातन काळापासून तपस्वी, ऋषीमुनी, संत हा उपाय मानतात. जपासाठी माळेची आवश्यकता असते आणि याशिवाय मंत्र जपाचे फळ प्राप्त होऊ शकत नाही. रुद्राक्षाची माळ जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे. रुद्राक्ष साक्षात महादेवाचे प्रतिक आहे. रुद्रक्षामध्ये सूक्ष्म किटाणू नष्ट करण्याची शक्ती असते. रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक उर्जा ग्रहण करून साधकाच्या शरीरात पोहचवतो. जप करण्यासाठी जी japmal उपयोगात आणली जाते त्यामध्ये १०८ मणी असतात. japmal मध्ये १०८ मणी का असतात यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे. माळ रुद्राक्ष, तुळस, स्फटिक किंवा मोत्याने बनलेली असते. या माळांमध्ये चमत्कारिक प्रभाव असतो. या माळेने एखाद्या मंत्राचा जप केल्यास कोणतेही कठीण कार्य सिद्ध होते.


जपमाळेचे नियम (japmaleche niyam):

1. डाव्या हाताने माळेला स्पर्श करू नये.

2. नित्य जपाची माळ मनगटात किंवा गळ्यात धारण करू नये.

3. माळेवर जप करताना मण्यांचा आवाज करू नये.

4. जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणी ठेवावी.

5. जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा.


जप करण्याची पद्धत (jap karnyachi padhat):

1. शास्त्रानिहाय गोमुखी वापरून जप करावा किंवा तसेच बोटांच्या सहाय्याने जप करावा.

2. अंगठयाच्या सहाय्याने जप केल्याने मोक्ष प्राप्ती होते.

3. तर्जनीने जप केल्याने शत्रुनाश होतो.

4. मध्यमेने जप केल्याने धनप्राप्ती होते.

5. अनामिकेने जप केल्याने शांतीप्राप्त होते.

6. करांगुलीने जप केल्याने सुंदरताप्राप्ती होते.

7. जपाची सुरुवात मेरू मण्यापासून करावी. मात्र शेवटी मेरुमणी ओलांडून पुढे जाऊ नये, जप पुढे चालू ठेवायचा असल्यास उलट क्रमाने पुन्हा मेरूमण्याकडे यावे.


जपाची शास्त्रीय पद्धत :

मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर मणी आणून त्यावर अंगठयाने दाब देऊन मणी शरीराच्या दिशेने ओढणे, या प्रक्रियेमुळे विद्युतशक्तीची निर्मिती होते.


अंगुष्ठमध्यमायोगात्सर्व सिद्धी प्रदासने।

अंगठा व मध्यमेने जप केल्याने सर्वसिद्धी प्राप्त होतात. 

जप पूर्ण झाल्यावर माळ जमिनीवर न ठेवता ताम्हणात किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावी. तसेच खुंटीवर किंवा उघडया जागेत सहज कुणाच्याही दृष्टीस पडेल अशी न ठेवता लाकडाच्या, चांदीच्या किंवा हस्तिदंताच्या डबीमध्ये ठेवावी. ही माळ पूर्वी कोणीतरी वापरली नसावी.

कार्तिकी पौर्णिमा, तुलसी विवाह, वैकुंठ चतुर्दशी आणि देव दिवाळी

श्री गोरक्षनाथ प्रकटदिन विशेष कथा

गोरक्षनाथांच्या गुरूभक्तिची ही कथा माहीत आहे का?